(मालकौंस रागात एक चाल सुचली त्यावर हे शब्द बसवले आहेत. याला काहीसा गझलचा घाट आहे असे मला वाटते. ऐकण्यास इथे क्लिक करा)
जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती
मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी
जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता
हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी?
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी
हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझा गुलाम मी
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा
भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
सुरेश नायर