Showing posts with label लघु कथा - Short Stories. Show all posts
Showing posts with label लघु कथा - Short Stories. Show all posts

Monday, June 20, 2016

Bhairavi

(When I wrote this story last year of course I had Kishori tai Amonkar in mind. I am saddened by her passing away. A heavenly voice has gone back to where it came from. But as it says in this story "Music is light; it will always be there passing from one day to other", her music will keep shining as bright as ever. My humblest tribute to a true artist)

Bhairavi


The concert was to begin at eight in the evening.  Almost fifteen hours still ahead of it. But the actual ceremony was supposed to start at seven. There would be the introductory speeches about the foundation with its purpose and objectives, the organizers behind it and the main sponsors. Then it would be time to introduce her, thanking her for agreeing to do the benefit concert, requesting her to come on stage and begin the concert. As usual there will always be the need to test the audio set up, adjust the levels to her appeasement, before she can even start with the first note.

Tuesday, March 29, 2016

खेळ मांडीयेला वाळवंटी

वाळूची पोती, सिमेंटचे ब्लॉक्स आणि खणलेले चर याचा आधार घेत, अहोरात्र दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या फैरी झडत होत्या.  तासाभराची म्हणून उसंत नव्हती. अचूक निशाण घेऊन कुणाला वर्मी मारणे हे फक्त आधी थोडे दिवस सुरु होते. नंतर नंतर बहुतेक बंदुकीचे बार हे फक्त "खबरदार एक पाउल पुढे टाकले तर" असा दम भरण्यासाठी होते. दिवस रात्र पाळत होती. दिवसाच्या रणरणत्या उन्हात वाळू तापून वाफेचे झोळ निघत राहायचे. इथे तिथे थोडसं गवत यापलीकडे बाकी सर्व वैराण होतं. छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यामध्ये उतरण असा प्रदेश आणि त्याच्या अल्याड पल्याड दोन्ही सैन्याचे तळ. काही ठिकाणी तर दोन्ही सैन्यात फक्त मोजक्या फर्लांगाचं अंतर होतं. अश्या उघड्यावर दिवसा पुढे येउन शत्रूची फळी तोडणं अशक्यप्राय होतं. म्हणून दिवसा त्यातल्या त्यात जरा कमी फैरी झडत. पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कुणी काय करेल याचा भरवसा नव्हता. म्हणून रात्री विशेष जागरूक राहायला लागायचं.

खरंतर नियमानुसार ठराविक काळाच्या अंतराने, विश्रांती देण्यासाठी पुढच्या फळीची तुकडी मागे पाठवून तिच्याजागी दुसरी तुकडी यायची. यामुळे नेहमी उत्साह आणि जोर  टिकून असायचा. पण यावेळी सीमेच्या बऱ्यापैकी मोठ्या भागावर एकाच वेळी गोष्टी तापल्या होत्या. सगळीकडचं वातावरण एकदम तंग होतं. म्हणून आहे तीच तुकडी एका जागी अनेक महिने आपला जम धरून होती. दिवसा काय तो आळीपाळीने आराम व्हायचा पण रात्री सर्वांनाच आपापल्या बंदुकी आणि जागा सरसावून सतर्क राहावं लागायचं. अर्थात ही परिस्तिथी दोन्ही कडे लागू होती.

अधून मधून नुसता आवाज आणि आरोळ्यावरून दोन्हीकडून एकमेकांना खबरदारीचा इशारा जायचा. एखादा सैनिक जोरात ओरडून देशभक्तीपर घोषणा द्यायचा. मग त्याला साथ देत आणखी सैनिक आपला आवाज मिसळायचे. मग दुसऱ्या बाजूने तसाच कल्लोळ माजायचा आणि कितीतरी वेळ कंटाळा येईपर्यंत हेच चालायचे. काही दिवसांनी खबरदारीचा इशारा, याच्या ऐवजी वेळ जाण्यासाठी, म्हणून हा एक प्रकारचा खेळ होऊन बसला होता. मग देशभक्तीपर घोषणांच्या जागी देशभक्तीपर गीते, मग नुसतीच गीते (पण एकदम जोशदार) असं चालायचं. पलीकडच्या बाजूचे कुणाकुणाचे आवाज सुद्धा ओळखीचे व्हायला लागले होते आणि त्यांना काल्पनिक, बऱ्याचदा गचाळ, शिवियुक्त नावे सुद्धा देण्यात आली होती. कुणी  डुक्कर, कुणी हराम कि औलाद तर कुणी त्यापेक्षा वाईट काही.

शांतीच्या काळात वर्षातून काही ठराविक प्रसंगी, म्हणजे  एकमेकांचे सर्वात महत्वाचे सण किंवा स्वातंत्र्य दिवशी म्हणा, दोन्ही बाजूंनी भेटवस्तू व रुचकर खाद्यपदार्थ-मिठाई यांची देवघेव व्हायची. हे खूपच शिस्तबद्ध पद्धतीने व बऱ्याच नियमांचे पालन करून व्हायचं. आणि फक्त वरच्या पातळीचे अधिकारी यात सामील असायचे. सामान्य सैनिकांना एकमेकांशी फारशी सलगी करण्यास सक्त मनाई होती आणि अर्थात तशी संधी सुद्धा नव्हती. पण तरीही काही अर्थी याचा परिणाम होऊन जरासा सलोख्याचा भाव यायचा आणि थोडे दिवस का होईना बंदुका  शांत व्हायच्या. पण गेल्या वर्षापासून पेटलेले युद्धाचे वारे अजून शांत व्हायची जराही चिन्हे दिसत नव्हती. राजकीय स्तरावर बोलणी, अंतरराष्ट्रीय देशांची मनधरणी, दटावणी, व मध्यस्ती असे सर्व प्रकार चालू होते. पण इथे, खऱ्या मैदानावर, जो जीवघेणा खेळ चालू होता त्याच्या समाप्तीची लक्षणे अजून केल्या दिसत नव्हती. अश्यात भेटी आणि मिठाई देण्याचा रिवाज मागे न पडला तर नवल. अहोरात्र दोन्ही बाजूंनी बंदुकीच्या फैरी मात्र झडत होत्या.

जसजसे दिवस जात होते तसतशी छावणीत काहीशी अस्वस्थता वाढत होती. सैन्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, बरोबर कि चूक याचा विचार न करता, वरून आलेला नियम अचूक पाळणे. अधिकाऱ्यांसमोर कसलीच तक्रार किवा साधी कुरकुर सुद्धा करायचा विचार कुणाच्या मनात नव्हता. स्वतः सैन्याचे अधिकारी राजकीय घडामोडींच्या आणि निर्णयांच्या अधीन होते. पण तरीही वस्तुस्तिथी अवघड होती. सुट्टी रद्ध झाल्यामुळे कुणाची लग्नाची तारीख येउन गेली होती, कुणाच्या घरात कधीचा पाळणा हलता झाला होता, कुणाला जवळच्या माणसाच्या शेवटच्या क्षणी जवळ राहता आलं नव्हतं. जवळच्या सगेसोयरे, मित्रमंडळी यांच्याशी साजरा करायचे वाढदिवस, सण वगैरे सर्व प्रसंग निसटून जात होते आणि या सर्वांचा अंत कुठे दिसत नव्हता.

आज वर्षाचा अखेरचा दिवस होता. मध्यरात्र उलटली कि नवीन वर्ष. जगभरात हा प्रसंग साजरा करायची आता एक परंपराच झाली होती. धर्म-जात-पात-भाषा, गरीबी-श्रीमंती या कशा कशाला न जुमानता जो तो जाणाऱ्या वर्षाला सलाम करीत नवीन वर्षाचं स्वागत करायला उत्सुक असतो. जणू काही आपल्या अपुऱ्या इच्छा, आकांक्षा येत्या वर्षात पुऱ्या होतील, किंवा किंबहुना व्हाव्यात अशी अपेक्षा करीत, सर्वांसोबत साजरा करायचा दिवस. इथे मात्र, गेल्या कित्येक महिन्यांच्या घटनांवरून हाही एक असाच निसटून जाणारा दिवस, अशी भावना होती. सकाळी कवायतीच्या वेळी एकमेकांना "संध्याकाळची पार्टी विसरू नका ", "खूप मजा करू" वगैरे उपहासात्मक शेरे दिले जात होते. एकूण नेहमीपेक्षा जरा जास्तच चैतन्य कमी होतं.

मग बातमी आली कि चोवीस तासाचा सीजफायरचा समझौता झालाय. आज दुपारी बारा ते उद्या दुपारी बारा पर्यंत दोन्ही बाजूची शस्त्रं शांत राहतील. खूप दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय प्रक्रियेला गती मिळाली होती. एका  बहुराष्ट्रीय परिषदेत महत्वाची बोलणी होणार होती आणि लढाई पूर्णपणे संपण्याची पुरेपूर खात्री वाटत होती.

या बातमीने सगळीकडे एकदम जल्लोष उठला. सुकलेल्या रोपाला पाणी घातल्यावर ते तरारून उठावं तशी सगळ्यांची अवस्था झाली. एकूण रंग पाहून वरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संध्याकाळी न्यू इयर पार्टीला परवानगी दिली. गावातून एक खानसामा बोलावून खास जेवणाचा बेत आखण्यात आला. नेहमीपेक्षा मद्याचा कोटा वाढवला गेला. राष्टीय झेंड्या सोबत इकडे तिकडे थोडेबहुत रंगीत कागद वगैरे सुद्धा फडकू लागले. कुणीतरी दिव्याची माळ लावली. संध्याकाळ होईस्तोवर  वातावरण पूर्ण बदलून गेले होते.

हळू हळू जमवा जमव सुरु झाली. चियर्सच्या आवाजात काचा एकमेकांना भिडू लागल्या. गप्पा टप्पा, विनोद आणि त्यावरून उठणारे हास्याचे फवारे उठू लागले. अधेमध्ये पलीकडच्या बाजूने देखील तसेच आवाज कानी येत होते. गेल्या कित्येक दिवसांचे चिंतेचे ओझे जणू गळून पडले होते आणि एक निश्वासाचे, आशेचे, हलकेपणाचे असे विश्व तयार झाले होते. मधेच कुणीतरी खिशातून मौथ ऑर्गन काढला आणि एक हलकीशी धून हवेत उठली. त्यात मग शब्दांची भर पडली आणि सूर उठले. पण आजचे सूर जोशिले, रखरखीत नव्हते तर आनंदी, आतुर असे होते. अर्थात सगळेच काही या सोहळ्यात सामील नव्हते. अजून ठिकठिकाणी पाळत होती, बंदुका सज्ज आणि सावध होत्या, फक्त नेहमीच्या इतक्या संख्येत नव्हत्या.

तास दोन तास असेच गेले. जेव्हा पार्टी सुरु झाली तेव्हा सर्वांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. खूप दिवस अंधारात राहिल्यावर उजेडाची सवय व्हायला वेळ लागतो, त्याचा त्रास होतो तसं झालं होतं. मग हळू हळू त्यात ढील पडली, हलकेपणा आला, आणि सर्वजण खऱ्या अर्थाने पार्टीचा आस्वाद घेऊन लागले. आणि तेवढ्यात धपकन आवाज आला. कुठ्न, कसला ते समजायच्या आत जो तो क्षणार्धात सावध अवस्थेत गेला. रातकिड्यांच्या आवाजाखेरीज सगळीकडे चीडीचाप शांतता पसरली. आणि कुणाचंतरी लक्ष एकदम मध्ये पडलेल्या एका फुटबॉल कडे गेले. त्याने नुसताच इशारा करून दुसऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं. कुणीच काही हालचाल केली नाही. इतक्यात टेकाडाच्या पलीकडून आवाज आला " हरामी साला, अक्कल नाही. सांगितलं जपून कुठे मारतोय तिकडे लक्ष दे तर नाही. तुझ्या कॉलेजचं मैदान वाटलं का कुठेपण बॉल मारायला. आता अंधारात शोधणार कुठे. आणि सापडला नाही तर खेळणार काय ? एकच तर होता" आणि असेच बरेचसे कुरकुरते स्वर ऐकू येऊ लागले.

इतका वेळ रोखून धरलेले श्वास आता सुटले. शरीरं ढिली पडली. जराशी हालचाल सुरु झाली. मग घोळक्यात एकमेकांशी जरा कुजबुज झाली. आणि एकजण जोरात ओरडला " फुटबॉल शोधताय का ? इथे आमच्याकडे आलाय ". आता पलीकडची बाजू मघासारखी शांत पडली. दाट धुकं साचावं तशी हवा दाटून आल्याचा भास होत होता. ऐन लढाईच्या वेळी जितका तणाव कधी जाणवला नाही तितका आता जाणवत होता. मग पलीकडून उत्तर आलं "हो, आमचा बॉल आहे. आम्ही काहीजण नुसतेच खेळत होतो". त्यासरशी एकाने "होशियार, पाचच्या काउंटला बॉल येतोय" अशी आरोळी देत एक, दोन, तीन, चार मोजले आणि पाचला एक जोरदार किक मारून बॉल, जिथून आवाज आला तिथे परतवला. पलीकडून एकच आवाज उठला आणि कुणीतरी "खूप खुप धन्यवाद" असे ओरडले.

मग हळू हळू दोन्हीकडून एक संवाद सुरु झाला. आधी 'हैपी न्यू इयर" अश्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या गेल्या. मग '"पार्टी कशी चालली आहे" वगैरे झाले. खायला पदार्थ काय, प्यायला काय याचीही चौकशी होऊन गेली आणि उगाच "अरेरे आम्हाला पण ते खायला, प्यायला आवडलं असतं" वगैरे झालं. नंतर काय बोलावे ते कळेना पण काहीतरी दुवा जुळला होता तो तसाच सोडून जावं असं कुणाला वाटत नव्हतं. मग एकजण ओरडला "अरे सिझफयार आहे,  शस्त्रं चालवायची नाही असा हुकुम आहे मग प्रत्यक्ष एकमेकांची तोंडे तरी बघुयात. पुन्हा मौका मिळणार नाही". त्यासरशी पुन्हा शांतता पसरली, तणाव जाणवला. आणि मग आवाज आला "चालेल पण हात रिकामे नको, तुमच्याकडचे चमचमीत पदार्थ घेऊन या" आणि त्यासरशी हशा पिकला. मग दोन टेकाडाच्या मधून जिथे मोकळी मैदानासारखी जागा होती त्याच्या दोन्ही बाजूच्या सीमारेषेवर सर्व जमले. दोन्हीकडचे एकदोन जवान धाडस करून पुढे सरसावले आणि हळू हळू पावले टाकीत मध्यभागी आले. पुढे येउन एकमेकांचे हात हाती घेत शुभेच्छा दिल्या. तसे इतरही जवान पुढे आले. काही जणांनी खरंच काही खायचे पदार्थ, सिगारेट्स वगैरे भेटी आणल्या आणि एकमेकांना दिल्या. नावेगावे याची अदलाबदल झाली. तुटपुंजी का होईना ओळख जमली.

माणुसकीचा एक अभूतपूर्व सोहळा अगदी आपसूक, न सांगता, न ठरवता या रात्री इथे वाळवंटात घडत होता. ओळखीच्या आवाजाला आज चेहरे आणि नावे आली होती. सीमा पुसट झाल्या होत्या. सर्वांना माहित होते की जे होतं ते अल्पकाळा करताच होतं. त्याला खूप काही महत्व नव्हतं. उद्या कदाचित बातमी येईल कि सलोखा झालाय, युद्ध संपलंय पण तेही नेहमीचेच टिकेल याचा नेम नाही. याआधीही अनेकदा भडका उडालाय, त्यावर पाणी पडलंय आणि पुन्हा भडका उडालाय. आणि कदाचित बातमी येईल कि बोलणी मोडून पडली. पुन्हा लढाईला सुरवात होउदे. पुन्हा तोफा डगडगू द्या. पुन्हा आपआपली शस्त्रे  हातात घ्या. मात्र यावेळेला गोळी झाडताना पलीकडच्या वाळूच्या पोतींच्या आड, रात्रीच्या अंधारात दिसलेला एखादा चेहरा असल्याचा भास होईल. आणि मध्ये दम घेताना पेटवलेली सिगारेट, कुणी दिलेली भेट असेल. पण हे सर्व कदाचित नंतर आठवेल. ऐन निर्णयाच्या वेळी कर्तव्यात रुजलेली बोटे मात्र बंदुकीचा चाप ओढताना अजिबात अडणार नाहीत.

जशी जमली तशी हळू हळू पांगापांग सुरु झाली. एकमेकांचा निरोप घेत सारे एकेक करून मागे फिरू लागले. मधलं मैदान पुन्हा रिकामं झालं. अनेक पावलांच्या  ठश्यांच्या रेघोट्या मात्र सर्वत्र येता जाताना दिसत होत्या. आणि अधून मधून, इथे तिथे फक्त पुसटश्या आवाजात ऐकू येत होतं "हैपी न्यू इयर दोस्त, हैपी न्यू इयर"
सुरेश नायर
३/२९/२०१६

(काही दिवसापूर्वी आम्ही बुक क्लब मध्ये पहिल्या महायुद्धावर पुस्तक वाचलं. तेव्हा 'Christmas Truce' बद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली व कुतूहल वाटले. मग जरा शोध घेताना भारत-पाकिस्तान सैन्याचं होळी-ईदला वगैरे मिठाई देण्याबद्दल वाचले. सर्व एकत्र येउन ही कथा रचली. सुरुवातीला तसं ठरवलं नव्हतं तरी लिहिताना कुठला ठराविक देश प्रदेश न देता neutral ठेवणेच योग्य वाटले. पात्रंही तशीच. ही कथा जशी एक ठिकाणी घडली तशी इतरत्र कुठेही घडू शकते
***मला सैनिकी जीवनाचा काहीही अनुभव नाही. आहे ते सर्व काल्पनिक आहे. त्यामुळे तांत्रिक चुका भरपूर असू शकतात. त्याबद्दल क्षमस्व*** )

Saturday, March 19, 2016

Boats

Boats


I met her first time when we went to Das uncle. My Father and Das uncle were playing chess. She brought over coffee and some snacks for us. Bittu was sick so Mother and him did not come with us. If he would have been there then we would have either played with something or at least fought over something. We would have killed the time. But since I was alone, I got bored.

Then she took me to her room. On a table there were many paint bottles and brushes. And the walls were all covered with paintings. Most of the paintings had boats in them. Blue skies, mountains, blue-green water, water lilies, a pair of ducks and boats. Sometimes a lot of them floating on waves in a sea or an ocean, other times just a single boat on a lake.

“Did you paint these?” I asked.

“Yes” She said.

“You only know how to draw boats?”

She smiled. “No, I can draw a lot of other things. But I mostly love to draw boats”

“Why?”

“A boat floating on the waves in the water. How great it must feel to sit and sway in it. As if you are in your mother’s arms. You can use the oars if you feel like it or just let the wind take you somewhere on its own. Who knows what shore you may reach, what you may see. Will you come with me?

“I don’t know. Daddy may scold me.”

“Ok, then. But could you at least come with me so we can let the boats flow in rushing rainwater? When I was small, whenever it rained I used to make boats and send them floating on water and running after them. They were just paper boats. After going a little far they used to stop, getting stuck somewhere and after going in circles couple of times, they used to drown away. I used to cry a lot and Mummy would have a hard time pacifying me”

“It’s no big deal, you can just make another one.” I said.

“Will you make some for me?”

“Yes,  Sure. Give me some paper. But it’s not yet time for rain so we can’t float them in rainwater.”

“Then we will wait for the rains to come……”

She gave me a nice colorful square paper. I folded it twice making it into a boat and gave it to her.

“Wow, beautiful. It’s so nice. Make some more for me when you come next time.”

Then Daddy called and we started for home. I looked back and saw her standing outside the door, with the boat in her hand.

After that we went to their home many times. Sometimes Gandhekaka used to come as well with his dog named Chinku.  When Father and Das Uncle were playing chess, Gandhekaka made me play with him. Maybe he wasn’t as good of a player as Father or Das Uncle. She used to take Chinku out. He was very fond of her and used to play with her a lot.

Every time I used to make some boats for her that I had learned from others. Except for a little difference most of them were all alike but they had different names such as bambi boat, anchor boat, sail boat. She always showed surprise and amazement with wide eyes when I showed her how to make those boats and she then used to keep them on a shelf. All the boats I gave her were neatly lined up on the shelf. There were also many new paintings on the wall, with some boats very much like the boats I had made. At least that’s what I imagined.

Sometimes we used to play a game. We used to pretend that we were in a boat and with closed eyes imagine what all we were seeing as we floated by. We used to describe in rich details flower gardens, orchards, jungles with animals and weird, scary beasts, tiny villages and big towns. It was a lot of fun to play that game.

Once we went over and I saw a beautiful boat made of wood, with delicate, exquisite carving on it. It was on the same shelf where my boats were sitting, occupying the center most space. I asked her who gave it and she said someone gave it to her as a birthday gift.

“One of the girls from your childhood?” I asked

She smiled “No, a new friend who is a man. Just like you. But no one knows about him. It’s…..our secret and now only you know it. Don’t tell anyone yet. You won’t, right?”

I just shook my head saying I won’t. But all the time I kept looking at that boat. My paper boats looked so simple and childish aside that wonderful boat.

Not too long after that they all came to us for dinner. Gandhekaka also came with Chinku. Bittu said she was get married and going somewhere far off to another country. He always overhears other people’s conversations and keeps telling everyone about it.

Everyone was speaking a lot with each other. She also talked a lot, more than usual and louder than other times I thought. She even played with Chinku. But she didn’t speak with me. In fact I didn’t say much to anyone. Only when Das uncle asked me one question twice, she said, ”Daddy, You are a bit too much”. When they were ready to go, everyone went to the door to say goodbye. She hugged and waved a lot and kept saying “Bye Uncle, Bye Aunty, Bye Bittu, Bye Chinku”. Then she didn’t say anything and just left.

After a while Father again took me to Das Uncle but she had left the country by then. Uncle said there was something for me in her room. I went and saw that all pictures on the wall and the paint bottles and brushes on the table were gone. There was a box on the table. I opened the box and saw the wooden boat and a pack of color papers, new and unopened. I glanced at the shelf and saw that it was empty.

Once we came home, I kept the box in the lower shelf in my room and kept some of my old story books on top. Bittu likes to play a lot but he isn’t that interested in reading.

That year it did not rain until very late in the season. And when it did, there were only some weak showers. The water never gushed and flowed strongly. The pack of color papers remained unopened. No boats were made. But I know how to make a lot of boats, bambi boat, anchor boat, sail boat and a normal boat……

Suresh Nair
6/26/2016


(This story is based on a Marathi poem “Hodya” written by Hemant Govind Joglekar. The poem is beautiful, evocative and abstract. I tried to fill the gaps with an imagined narrative, weaving a story together, while still trying to keep the full essence of the poem intact.)

Friday, March 18, 2016

होड्या (Hodya)

बरचसं काही वाचनात येतं, पण त्यातलं काहीच एकदम चटकन मनाला भावतं. इतक्यात वाचनात आलेल्या दोन कविता माझ्या मनात एकदम खोल घर करून राहिल्यात. एक म्हणजे बोरकरांची "संधीप्रकाशात" आणि दुसरी हेमंत गोविंद जोगळेकर यांची "होड्या". हेमिंग्वेच्या लघुकथा त्याचं लेखनतंत्र  वाचताना "Iceberg Theory " बद्दल वाचलं होतं. उघड उघड अगदी मोजक्या गोष्टीच मांडायच्या, पण बरचसं अनुत्तरीत तरी उकल करता येण्याजोगं  ठेवायचं. "होड्या" मला तशीच वाटली. इथे मी त्या iceberg चा पाण्याखालचा भाग कसा असेल याचं एक कल्पनाचित्र मांडलंय. मला स्वतःला अजून एक - दोन तरी वेगळी चित्र दिसतायत. कुणाला कदाचित आणखी दिसतील.
 होड्या
 दास अंकलकडे आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा ती भेटली. बाबा आणि दास अंकल चेस खेळत होते. तिनं कॉफी आणि फरसाण दिला. बिट्टूला बरं नव्हतं म्हणून तो आणि आई घरीच होते. तो असता तर आम्ही काहीतरी खेळलो असतो नाहीतर एकमेकांशी भांडलो तरी असतो. वेळ गेला असता. पण मी एकटाच होतो म्हणून कंटाळलो. 
मग तिने मला तिच्या खोलीत नेले. टेबलावर खूपश्या  रंगाच्या बाटल्या  आणि  पेंटिंगचे ब्रश होते. आणि भिंतीवर सगळीकडे चित्रं होती. बऱ्याचश्या चित्रात होड्या होत्या. निळं आकाश, डोंगर, हिरवं - निळं  पाणी, कमळं, कधी बदकाची जोडी  आणि होड्या. कधी समुद्रावर एकदम खुपश्या तर कधी नदी किंवा तळ्यात एकटीच होडी. 
"तू काढल्यास?" 
"हो" 
"तुला फक्त होड्याच काढता येतात का ?" 
ती हसली "नाही, बाकी सुद्धा काढू शकते . पण मला होड्या खूप आवडतात " 
"का?" 
"पाण्याच्या लाटेवर झुलणारी होडी. त्यात बसून तरंगायला किती छान वाटतं. आईच्या कुशीत असावं तसं. हवं तर वल्हव वापरायचा नाहीतर वारा घेऊन जाइल तिथे जायचं. कधी कुठला किनारा लागेल, काय दिसेल कुणी सांगावं. तू येशील माझ्याबरोबर ?" 
"माहित नाही. बाबा रागावतील " 
"ठीक आहे. पण माझ्याबरोबर पावसाच्या पाण्यात तरी कागदाच्या होड्या सोडशील ना ? लहानपणी पावसाच्या सरी आल्या कि मी होड्या करून वाहत्या पाण्यात सोडायचे आणि तिच्यामागे धावत जायचे. कागदीच त्या, फार लांब जायच्या नाहीत. मग थांबून, गटांगळ्या खात त्या बुडाल्या कि मी खूप, खूप रडायचे. मम्मीला  मला समजावता समजावता नाकीनऊ यायचं " 
"त्यात काय, दुसरी करायची" 
"तू देशील करून ? " 
"हो, देईन कि. कागद दे. पण आता पावसाळा नाहीये म्हणून पावसात सोडता नाही येणार " 
"मग आपण पावसाची वाट बघूयात.. .” 
तिने एक छान रंगीत चौकोनी कागद दिला. तो दोन वेळा दुमडून मी होडी केली आणि तिच्या पुढे धरली. 
"वा. सुरेख. किती छान केलीस. पुढच्या वेळी येशील तेव्हा आणखी करून दे " 
मग बाबांनी हाक मारली आणि आम्ही निघालो. मी वळून पाहिले  तेव्हा तिच्या हातात ती होडी होती. 
त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो. कधी कधी त्यांच्या चिंकू कुत्र्याला घेऊन गंधेकाका सुद्धा यायचे. बाबा आणि दास अंकल चेस खेळायला लागले कि गंधेकाका मला त्यांच्या बरोबर खेळायला घ्यायचे. ते बहुतेक बाबा आणि अंकल इतकं चांगलं खेळत नसावेत. ती चिंकुला बाहेर घेऊन जायची. चिंकु तिच्यासोबत खूप छान खेळायचा. 
दरवेळी मी कुणाकुणाकडून शिकून घेतलेल्या वेगवेगळ्या होड्या करून तिला द्यायचो. थोड्याफार फरकाने त्या सर्व सारख्याच होत्या पण नावे मात्र वेगवेगळी - बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची होडी. ती मात्र एकदम डोळे मोठे करून आनंद झाल्याचं दाखवायची आणि शेल्फ वर ठेवायची. मी दिलेल्या सर्व होड्या एका शेल्फ वर नीट मांडून ठेवल्या होत्या. भिंतीवरदेखील नवीन नवीन चित्रं येत होती, काही चित्रात मी केलेल्यासारख्या होड्या होत्या असं मला वाटलं. 
कधी कधी आम्ही केलेला एक खेळ खेळत असू. डोळे मिटून दोघे होडीत बसलोय अशी कल्पना करायची आणि आजूबाजूला जे काही दिसतंय ते सांगायचे. कधी फळाफुलांच्या बागा, कधी जंगल, प्राणी, राक्षस, कधी मोठं शहर, असं खूप काही भरभरून सांगायचो. हसायचो. एकदम मजा यायची. 
एकदा मी गेलो तर तिच्याकडे एक सुंदर लाकडाची, नाजूक कोरीव काम केलेली होडी दिसली. माझ्या होड्या ज्या शेल्फवर होत्या त्यात सर्वात मध्ये ती होती. मी विचारलं तर म्हणाली तिच्या वाढदिवसाला कुणीतरी भेट म्हणून दिली. 
"मैत्रिणीने दिली ?" 
ती हसली "नाही मित्राने दिली. तुज्यासारखाच माझा एक खूप चांगला मित्र आहे. पण इतर कुणाला माहित नाही. आमचं…. आणि आता आपलं गुपित आहे ते. कुणाला सांगू नकोस. नाही ना सांगणार ? " 
मी मान हलवली "नाही सांगणार ".  पण माझं लक्ष त्या होडीकडेच होतं. तिच्या शेजारी माझ्या कागदी होड्या अगदी साध्या वाटत होत्या. 
नंतर जवळ जवळ लगेचच ते सगळे आमच्याकडे जेवायला आले. गंधेकाका सुद्धा चिंकुला घेऊन आले होते. बिट्टू म्हणाला तिचं लग्न ठरलंय आणि ती परदेशी जाणार आहे म्हणून बोलावलंय. तो नेहमीच कुणाचं काहीतरी ऐकतो आणि सगळ्यांना सांगत असतो म्हणा. ते आले तेव्हासुद्धा तोच सांगत आला कि ती चालवत आली होती म्हणे गाडी. 
सगळे एकमेकांशी खूप बोलत होते. ती सुद्धा सगळ्यांशी चिक्कार बडबडली, नेहमीपेक्षा जरा जास्तच जोरात बोलत, हसत होती. चिंकुशी सुद्धा खेळली. पण माझ्याशी नाही बोलली. मी फारसं बोललोच नाही काही कुणाशी. फक्त दास अंकलनी दोनदा एकच प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं. ती शेजारीच होती, आणि फक्त म्हणाली " पप्पा, तुम्ही कमालच करता !". ते निघाले तेव्हा दारापर्यंत सगळेच गेलो. ती सगळ्याना बाय करत होती "बराय अंकल, बराय ऑन्टी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू " नंतर म्हणालीच नाही काही. 
काही दिवसांनी बाबा पुन्हा दास अंकलकडे घेऊन गेले तोस्तोवर ती गेली होती. अंकल म्हणाले माझ्याकरता काहीतरी दिलंय, तिच्या खोलीत आहे. मी गेलो तर रंगाच्या बाटल्या आणि ब्रश असायचे त्या टेबलावर फक्त एक बॉक्स होता. त्यात ती लाकडी होडी होती आणि रंगीत कागदांचा एक गठ्ठा. मी शेल्फ वर पाहिलं तर तो मोकळा होता. 
घरी येउन तो बॉक्स मी माझ्या खोलीत कपाटाच्या खालच्या कप्प्यात ठेऊन दिला. त्यावर माझी जुनी गोष्टीची पुस्तकं वगैरे ठेवली. बिट्टूला खेळ आवडतात, तो फारसा वाचत नाही. 
त्यावर्षी खुप उशिरापर्यंत पाउस पडला नाही. पडला तोही अगदी थोडा जेमतेम, भुरभुरा. पाणी जोरात वहायलंच नाही. रंगीत कागदांचा गठ्ठा न उघडता तसाच राहिला. होड्या केल्याच नाहीत. पण मला पुष्कळ होड्या येतात, बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची होडी आणि साधी होडी……

सुरेश नायर
३/१८/१६
(ब्लॉग वर हे प्रसिद्ध करायच्या आधी 'होड्या' कवितेचे कवी श्री. हेमंत गोविंद जोगळेकर यांची परवानगी घेतली होती. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार)

Tuesday, December 31, 2013

लाइफलाईन (लघु कथा)


विसुभाउंनी पुन्हा एकदा घड्याळाकडे आपली नजर वळवली. पाचला आणखी पाच मिनिटे बाकी होती. त्यांच्या तोंडातून एक मोठा निश्वास बाहेर आला. खरंतर पाचला सात मिनिटे होती तेव्हा त्यांनी घड्याळ पाहिले  होते आणि मनाशी  घट्ट राहून परत तिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरविले होते. पण वेळही मोठा गमतीदार असतो आणि आपल्याशी खेळत राहतो. कधी ससा होऊन लांब लांब उड्या मारत नको तेवढा पटकन जातो तर कधी कासवाच्या गतीने पुढे सरकतो. आज त्याने कासवाचे रूप धारण करून विसुभाऊंना छळायचे असे ठरविले होते. अर्थात हे सगळे विचार या दोन मिनिटात त्यांच्या मनात येउन गेले आणि त्यांना वाटले कि काटा ४-५ मिनिटांनी पुढे सरकला असेल. पण अजून पाच मिनिटे निघायची होती.

        खरंतर आता दोन महिने उलटले होते तेव्हा शरीराला भुकेची सवय झाली होती. सकाळी एखादं फळ किंवा चहासोबत दोन-तीन बिस्किटं, दुपारी डब्यात एखादी पोळी आणि खूप काकडी-गाजर- टोमॅटो-कोबी अश्या कुठल्यातरी भाज्यांची कोशिंबीर, तीनच्या सुमारास समस्त ऑफिसच्या लोकांना, निव्वळ झोप उडावी, या हेतूने आलेला समोरच्या टपरीवरचा चहा आणि संध्याकाळी घरी गेल्यावर पुन्हा एक पोळी, एक पळी भाजी, नैवेद्याच्या मुदी एवढा भात आणि एक वाटी ताक. बस, गेले दोन महिने रोज हाच विसूभाऊंनी चालवलेला आहाराचा राबता होता. अर्थात फक्त त्यांच्याने हे करणं ही अश्यक्यप्राय गोष्ट होती, पण वहिनींनी त्यांना शपथ घातली होती तेव्हा त्यांना हे करणं भाग होतं.

        शपथेचं आठवलं आणि विसुभाऊ स्वतःशीच हसले. वहिनींना वाटलं होतं कि त्यांच्या शपथ घेण्याच्या आग्रहावरून विसुभाऊ हा आहारसंयम पाळायला तयार झाले. पण त्याआधी वहिनींच्या 'माझ्यासाठी तरी तुम्ही हे करा. तुमच्याशिवाय’ या अर्धवट सोडलेल्या वाक्यावरच भाउंचा निर्धार पक्का झाला होता. झालं काय, एका संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आधी ते कुणापाशी काही बोलले नाहीत. कामाच्या ओघात वहिनींना सुद्धा काही जाणवलं नाही. पण मग शेजारच्या जोश्यांचा कुमार, उदया कामाकरता म्हणून दोन वर्ष अमेरिकेला जाणार होता, तो दोघांच्या पाया पडायला म्हणून आला आणि बोलुन गेला ‘वहिनी, दोन वर्ष तुमच्या भज्यांशिवाय काढावी लागतील’. वहिनींनी लगेच 'अरे आला आहेस तर पटकन चार तळते, खाऊनच जा' म्हणून करून आणल्या आणि विसुभाउंसमोर सुद्धा बशीत चार भज्यां ठेवल्या. पण कुमार गेला तरी त्या बशीत तश्याच आहेत ते पाहून त्यांनी भाऊंना निरखून पाहिलं आणि क्षणात 'चला दवाखान्यात' असं म्हणून त्यांचा हात धरला.

        दवाखान्यात जाईस्तोवर भाऊंनी वहिनींना आपलं दुखणं सांगितलं पण वहिनी शांतच राहिल्या. मग तपासणी वगैरे सगळं झाल्यावर डॉक्टर म्हणाले ' तुमचं कॉलेस्त्रोल लेवल बरंच वाढलंय, सध्या औषधं लिहून देतो. पण ताबडतोब आहारावर नियंत्रण आणा. तेलकट वर्ज्यच करा, नाहीतर हार्ट अटाकचे चान्सेस खूप वाढतील. व्यायाम, चालणं सुरु करा. दोन महिन्यांनी पुन्हा तपासुयात'. दवाखान्यातून परत येताना वहिनी आणखीनच सुन्न झालेल्या होत्या. विसुभाऊ सुद्धा काय बोलावं ते न कळून गप्पच राहिले. घरात पाउल टाकतो न टाकतो तोच वहिनी, मागून दार लावून, त्यांचा पाठीशी आल्या आणि डोकं टेकवून रडू लागल्या. विसुभाऊ मग त्यांचा हात धरत त्यांना बसवत म्हणाले 'अगं त्यात काय. दिली आहेत ना औषधं. मग काळजीचं काही कारण नाही. तू उगाच रडू नकोस. आण त्या भज्यां इकडे'. त्यावर वहिनींच्या चेहेऱ्यावर  जे भाव उमटले ते पाहून मात्र त्यांच्या छातीत चर्र झालं.

        वहिनींनी सरळ त्या भज्यां केरात टाकल्या आणि म्हणाल्या 'जळल्या मेल्या त्या भज्या. यापुढे या घरात पुन्हा व्हायच्या नाहीत. डॉक्टरांनी सांगितलंय तसं पथ्य पाळा, रोज संध्याकाळी आपण चालायला जात जाऊ. माझ्यासाठी तरी तुम्ही हे करा. तुमच्याशिवाय….…'. यापुढे त्यांना बोलवेना. तश्याच हुंदका देत राहिल्या. मग नंतर त्यांनी शपथ घातली होती. पण भाऊ म्हणाले 'अगं तुझ्या हातच्या भज्या न खाता पुढचं सारं आयुष्य काढणं म्हणजे महाभयंकर सजा आहे. तू सांगशील ते पथ्य मी पाळतो, दोन महिन्यांनी पुन्हा तपासणी आहे. गोष्टी आटोक्यात आहेत असं डॉक्टर म्हणाले तर मला चार भज्या करून दे. मग पुढचे दोन महिने मला सुखाचे जातील. डॉक्टरांची औषधं सोड, तुझ्या भज्या माझ्यासाठी लाइफलाईन आहेत'. नाईलाजाने मग वहिनी या सलोख्याला तयार झाल्या.  

        आता साध्या भज्या, मग त्यात एवढे विशेष काय असा प्रश्न कुणालाही पडणं अगदी साहजिक आहे. पण वहिनींच्या भज्यांची जादूच अशी होती कि कुणीही त्यावर जीव ओवाळून टाकावा. देव जेव्हा एखाद्या कलागुणांची वाटणी करत असतो तेव्हा कुणाच्या वाटेला काय येईल ते सांगता येत नाही. कुणाच्या गळ्यात तो मधुरस ओततो तर कुणाच्या हातात रंगा -चित्रांची जादुई चमत्कार घडविण्याची किमया. वहिनींना मात्र त्याने सुगरणीचा वर दिला होता, आणि त्यातही भज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचा किताब बहाल केला होता. साधी कांद्याची भजी, पण चवीला अशी काही रुचकर आणि खमंग कि खाणारा 'वाह क्या बात है' अशी दाद देऊन जायचा. बटाट्याची, पालकाची, वांग्याची, घोसाळ्याची, मेथीची अश्या नाना प्रकारच्या भज्या करण्यात वहिनींचा हातखंडा होता. विसुभाऊ आणि वहिनी यांचे सर्व स्नेही, सर्व मित्रपरिवार, सर्व शेजारी इतकेच काय तर त्यांच्या ओळखीच्या लोकातही वहिनींचा हा लौकिक प्रसिद्ध होता.

        विसुभाउंच्या ऑफिसातले मित्र महिन्यातून एका शनिवारी संध्याकाळी पत्ते खेळायचा अड्डा करत. घर कुणाचंही असो पण वहिनींना आमंत्रण आधी असायचं, भज्या करण्याकरिता. ‘आम्हाला काही येत नाहीत का?’ असं म्हणत दोघी-तिघींनी स्वतः करून घालायचा प्रयत्न केला, पण डाव सपशेल फसला. 'ठीक आहेत' या प्रतिक्रिया, जसजशी संध्याकाळ लांबत जाऊन रात्र व्हायला लागली आणि मद्याने जीभ सैल होऊ लागली तसतश्या 'साली तशी चव नाही' अशी होऊ लागली. मग त्या बायकांनी सुद्धा हात टाकले आणि तुम्ही येउन काय करायचं ते करून घाला असं म्हणत वहिनींना पाचारण केले. वहिनी अगदी न कुरकुरता, दरवेळी सगळं स्वतः करून घालायच्या आणि त्या बायका सुद्धा त्यांच्या मनापासून आभार मानायच्या.

        'आज ओवर-टाईम आहे वाटतं', जाता जाता टाकलेल्या शामरावांच्या या प्रश्नाने विसुभाऊ एकदम भानावर आले. घड्याळात काही सेकंदापूर्वीच पाच वाजून गेले होते पण बरचसं ऑफिस रिकामं झालं होतं. लोकल ट्रेन ही मुंबईची लाइफलाईन. अवघी मुंबई लोकलच्या तालावर फिरते आणि लोकल घड्याळ्याच्या काट्यावर चालते, त्यामुळे मुंबई सेकंदाच्या काट्यावरच पुढे सरकत असते. संध्याकाळी पाच वाजले कि एक सेकंद सुद्धा कुणी ऑफिस मध्ये राहत नसत, तसं  केलं तर लोकल मिस होईल आणि उरलेल्या दिवसाचं गणितंच चुकेल या भीतीनं. विसुभाऊसुद्धा लगबगीनं  आपली बॅग आणि जेवणाचा डबा घेऊन उठले आणि  ऑफिस मधून बाहेर पडले. आफिस ते स्टेशन पाच मिनीटाचं अंतर आणि ५:०९ ची लोकल म्हणजे तसा वेळ होता. पण त्यांची पावले जोरात पडू लागली. काही करून आज विसुभाउंना लोकल चुकवायची नव्हती, घरी वेळेवर पोचायचं होतं.

        दवाखान्यात जायची वेळ आली त्याला परवाच दोन महिने पूर्ण झाले होते. वहिनीं स्वतःच डॉक्टरची अपौइंट्मेंट घेऊन त्यांना पुन्हा तपासणी करण्याकरिता घेऊन गेल्या. आज तपासणीचे रिपोर्ट मिळणार होते. दुपारी लंचच्या सुट्टीत विसुभाऊ दवाखान्यात जाउन रिपोर्ट घेऊन आले. रिपोर्ट उत्तम होते. डॉक्टर तिथेच होते, तेही म्हणाले 'सगळं काही नॉर्मल दिसतंय, दोन महिन्यात खूप प्रगती आहे. पुढच्या तपासणीत असंच आढळलं तर आपण औषधं कमी करु. फक्त औषधाचा परिणाम नाहीये हा, जो काही रुटीन चालवला आहेत तो असाच सुरु ठेवा'. विसुभाऊ म्हणाले ' अहो माझ्याने काय होणार, हे सगळं आमच्या हिचं…' आणि डॉक्टरदेखील मोकळ्याने जोरात हसले.

        गेल्या दोन महिन्यात वहिनींनी जेवणाचाच नाही तर संध्याकाळी लांबवर चालण्याचा सुद्धा नियम केला होता. आधी विसुभाऊ कंटाळायचे पण मग त्यांना उलट त्याची आवड लागली. वहिनींशी होणारया गप्पातून भाऊंना त्यांच्याबद्दल बरयाच नवीन गोष्टी कळून आल्या. वहिनींच्या आवडी निवडी आपण कधी जवळून जाणून घेतल्याच नव्हत्या याची जाणीव त्यांना झाली. चार भिंतीतल्या त्या संसाराच्या पलीकडे वहिनींचं जग असेल का, याचा त्यांनी विचारही कधी केला नव्हता. पण घराबाहेरच्या, आजूबाजूला घडणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अश्या कितीतरी गोष्टीत वहिनींना रस आहे आणि त्यावर त्या सारासार विचार करून स्वतःची मतं स्पष्टपणे मांडू शकतात हे जाणून भाऊंना आश्चर्य वाटले. एक नवीन आदर निर्माण झाला आणि लग्नानंतर वहिनींना शिक्षण पूर्ण करून पदवीधर व्हायचा आग्रह न केल्याबद्दल चूक केल्यासारखे वाटू लागले. एक उत्तम शिक्षिका किंवा सामाजिक कार्यकर्त्या त्या झाल्या असत्या. त्यांनी तसे बोलून दाखवले पण वहिनीच म्हणाल्या ' विचारलं असतं तर तुम्ही नाही थोडंच म्हणाला असता? आणि मी कुठली तक्रार करतेय किंवा संसारात समाधानी नाहीये असं तुम्हाला वाटतं का?'. यावर विसुभाउंना बोलण्यासारखं काहीच नव्हतं.

        स्टेशनवर येईतो विसुभाऊ घामाळलेले होते आणि छाती भरून आली होती. उगीच घाई केली असं त्यांना वाटले. स्टेशन खच्चून भरले होते पण नेहमीच्या सराईतपणे विसुभाऊ लोकल मध्ये पटकन चढता येईल अश्या जागी येउन थांबले. छातीतले ठोके नॉर्मल होतायत इतक्यात लोकल आलीच. लोकल अर्थात नेहमीप्रमाणे भरली होती, तेव्हा बसायला जागा मिळायची सोयच नव्हती. विसुभाऊ दारापाशीच उभे राहिले. साधारण पंचवीस एक मिनिटांचा प्रवास होता. लोकल पुन्हा धावू लागली.

        विसुभाउंनी आजूबाजूला नजर टाकली. बहुतेक सगळे ओळखीचे चेहरे होते. काहींची नावे, ते कुठे काम करतात वगैरे ठाऊक होते तर काही नुसतेच तोंड ओळखीचे. नजरेला नजर भिडता काहीजणांनी ओळखीची चिन्हे दाखवली पण बहुतेक जण आपापल्या जगात मग्न होता. कुणाच्या डोळ्याभोवती चिंतेच्या रेषा, तर कुणाच्या ओठाशी कुठल्यातरी गोड आठवणींच्या स्मितरेषा होत्या. जन्मापासून मरणापर्यंत, एका बिंदूपासून दुसऱ्या  बिंदू पर्यंत, प्रत्येकाच्या आयुष्याची एक सरळ रेष असते. पण जरा जवळून, सूक्ष्मपणे पाहिले तर जाणवते कि ती रेष आहे तितकी सरळ नाही. तिला वळणं आहेत, चढ उतार, खाच खळगे आहेत. प्रत्येक रेष दुसऱ्यापेक्षा कमी जास्त, दुसऱ्या पासून वेगळी. एखादी खडकावर दगडाने ओढलेल्या रेघे सारखी ओबड धोबड, एखादी खडूने फळ्यावर काढलेल्या रेघे सारखी शिस्तबद्ध तर एखादी रांगोळीच्या ठिपक्यांना जोडणाऱ्या रेघे सारखी नाजूक, रंगाने भरलेली. विसुभाऊ स्वतःशीच हसले. वहिनींच्या सहवासात रोज चालताना, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची, कवितेची समीक्षणे  ऐकून आपल्या विचारात थोडी कल्पकता आली आहे असे त्यांना वाटले.

            'बाबूजी, कूछ पैसा दो ना. बहोत भूक लगी है', कडेवर एक-दीड वर्षाचं मुल घेऊन एक आठ-दहा वर्षाची मुलगी हात पुढे करून भीक मागत होती. रोजच्या सवयीमुळे फारसे प्रवासी तिच्याकडे पहातही नव्हते. एक दोघांनी खिशातून चार आठ  आणे काढून तिच्या हातावर ठेवले. ती विसूभाऊंच्या दिशेने आली तोवर त्यांचा हात खिशात पैसे काढण्याकरिता गेला होता. हातात पैसे आले त्यात दोन पाच रुपयांची नाणी होती. त्यातलं एक त्यांनी तिच्या हातात ठेवलं आणि मग त्या तान्ह्या मुलाकडे पहात दुसरं नाणं सुद्धा तिला दिलं. मुलीने एकदा हातातल्या नाण्यांकडे आणि एकदा विसुभाउंकडे पाहिले. मग नाणं कमरेवर परकरात गुंडाळत ती निघून गेली. विसुभाउंना कल्पना होती कि त्या मुलाशी तिचा काही संबंध नसेल, भीक जास्त मिळावी म्हणून जो कुणी या मुलांना भीक मागायला धाडत असेल त्यानेच ते मुल तिच्याकडे दिलं असेल. ते पैसेही बरेचसे कदाचित त्याच्याच हातात जातील, पण मुलीने एक नाणं चटकन परकरात गुंडाळलं यावरून त्यांना बरं वाटलं. कदाचित ते तरी त्या माणसाच्या हातात न जाता तिला मिलेल अशी आशा त्यांना वाटली.

                विसुभाऊ आणि वहिनींच्या लग्नाला सतरा वर्षे उलटून गेली होती  पण अपत्यसुख नव्हते. सुरवातीला घरच्यांच्या आग्रहावरून उपास तपास, देव दर्शनं, वगैरे झाली. खरंतर दोघांच्या घरच्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून दोघांनी न कुरकुरता या गोष्टी केल्या पण दोघांना जाणीव होती कि याचा काही उपयोग नव्हता. मग विसूभाऊंनीच वहिनीपाशी विषय काढला डॉक्टरांच्याकडून तपासणी करून सल्ला घेण्याचा. वहिनी नुसत्याच बघू म्हणाल्या पण तितक्याश्या उत्साही वाटल्या नाहीत. भाऊंनी दोन-तीन दिवसांनी पुन्हा विषय काढला तेव्हा वहिनी म्हणाल्या 'घडायचं असतं तर आत्तापर्यंत होऊन गेलं असतं, पण तसं झालं नाही. डॉक्टरांनी निष्कर्ष काढला कि आपल्या दोघांपैकी एकात दोष आहे तर आपण काय करायचं? एकमेकांना पारखं होऊन दुसरं लग्न करायचं? माझ्याकडून ते घडणार नाही आणि माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा तसं काही करणार नाहीत. मग मार्ग उरतो एखादं मुल दत्तक घेण्याचा. पण ज्याच्यात दोष नाही त्याला कदाचित नेहमीच आपल्याला तडजोड करावी लागली असं वाटेल. त्यापेक्षा आपण सरळ दत्तक घेऊ किंवा असेच राहू. तुमच्या भावाची, इतर नातेवाईकांची मुलं काही आपल्याला परकी नाहीत, आपण त्यांच्यावर आणि ते आपल्यावर तितकीच माया करतात. शिवाय त्याबाहेरही गरीब, अनाथ मुलांची कमी नाही. कदाचित एखाद दुसरं मुल वाढवण्यापेक्षा अश्या गरजू मुलांची मदत आपल्याकडून व्हावी असं देवाच्या मनात असेल'. अनेकदा व्हायचं तसं यावेळीदेखील विसुभाउंना बोलण्यासारखं काहीच नव्हतं.  

            दत्तक घ्यायचं राहून गेलं पण नात्यातल्या आणि शेजारच्या सगळ्याच मुलांची वहिनी ही आवडती मावशी, आत्या, मामी, काकू होऊन राहिली होती. त्यामुळे घरी सतत मुलांची ये जा असायची. आजूबाजूच्या बऱ्याचश्या घरात दोघे कमावते होते, त्यामुळे त्यांची मुले शाळेतून लवकर घरी यायची त्यांना खाऊ-पिऊ, शाळेचा अभ्यास वगैरे वहिनी करायच्या. त्यातली बरीचशी आता मोठी होऊन, शिक्षण, नोकरी साठी बाहेर पडली होती पण पुन्हा आली की वहिनींच्या हातचं खाल्ल्याशिवाय जायची नाहीत. आणि त्यातही भज्यांना विशेष मागणी. आपले विचार घोळून पुन्हा भजीपाशी आले याची विसुभाउंना गंमत वाटली. एखादी गोष्ट मनात ठाण मांडून बसली कि कितीही दुसरा विचार करो, पुन्हा फिरून आपण त्यावरच येतो. पण असू दे, आता आपलं स्टेशन आलंच आहे, आणि स्टेशन पासून घर अगदी तीन चार मिनिटांच्या अंतरावर तेव्हा फार वाट पहावी लागणार नाही, या विचाराने विसुभाऊ विसावले. गाडीचा वेग मंदावला आणि गाडी स्टेशनवर येउन लागली.

            माणसांच्या उतरत्या लोंढ्यासोबत विसुभाऊ सुद्धा खाली उतरले. कधी एकदा घर गाठू असं त्यांना झालं होतं. डॉक्टरांचा रिपोर्ट घेऊन ऑफिस मध्ये आल्या आल्या त्यांनी वहिनींना फोन केला होता. आधी त्यांना वाटले जरा गंमत करावी आणि रिपोर्ट चांगला नाही असं सांगावं, पण वहिनींचा काळजीचा चेहरा त्यांच्या समोर आला आणि त्यांनी तो विचार काढून टाकला. वहिनींनी फोन घेतल्या घेतल्या त्यांनी रिपोर्ट चांगला आहे असं सांगून टाकलं. वहिनींनी पुन्हा पुन्हा विचारून सगळी रीतसर माहिती घेतली तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली. इतक्यात साहेबांनी बोलावलंय असं सांगत ऑफिस मधला प्यून आला म्हणून त्यांना घाईघाईत फोन ठेवावा लागला.

            ट्रेनचा जोरात वाजलेला होर्न आणि त्यासोबत एक मोठा सामुदायिक कल्लोळ उठला. काय झालं म्हणून पहायला विसुभाऊ मागे वळले आणि त्यांच्या छातीत धस्स झालं. मघाशी भीक मागणारी मुलगी रुळावर होती. काहीतरी पडलं होतं ते उचलायला म्हणून ती वाकली होती. आता तिच्या हातात ते मुल नव्हतं पण त्या रुळावरून जाणारी दुसरी लोकल वेगाने स्टेशनवर येतेय ह्याकडे तिचं लक्ष नव्हतं. लोक मोठ्याने ओरडून तिला रुळावरून बाजूला हो म्हणून सांगत होते पण जे काही उचलण्याचा तिचा प्रयत्न चालला होता त्यात ती गर्क होती. विसुभाउंना आपण दिलेल्या नाण्याची आणि तिने तो परकरात खोचल्याची आठवण झाली. त्यांच्या हातातून ऑफिसची बॅग आणि डबा आपसूक खाली पडला आणि कसलाही विचार न करता त्यांनी प्लॅटफॉर्म वरून थेट रुळावर उडी घेतली. जमावातून आणखी आवाज उठला, विसुभाऊ धावत मुलीपाशी गेले, तिच्यापाशी पोचतो न पोचतो, तोवर ती जे काही घ्यायचा प्रयत्न करत होती ते घेऊन रुळावरून उडी मारून पलीकडे गेली. विसुभाउंनी पाहिले, तो ती मुलगी कागदाच्या पुरचुंडीतुन काढून एक भजी तोंडात टाकत होती. त्यांना दुपारी फोन ठेवायच्या आधी ऐकलेले वहिनींचे शब्द ऐकू आले 'संध्याकाळी भजी करते'. आणि विसुभाऊंच्या आयुष्याची रेघ दुसऱ्या बिंदूवर येउन टेकली.

सुरेश नायर
डिसेंबर २०१३

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...