Showing posts with label विनोदी कविता. Show all posts
Showing posts with label विनोदी कविता. Show all posts

Thursday, March 17, 2016

ट्रीटमेंट ट्रीटमेंट

Treatment

धरलाय तिने आज अबोला, न बोलता दे टोला
Silent Treatment Silent Treatment

पूर्णपणे दुर्लक्ष, नाही नुसताही एक कटाक्ष
Blind Treatment Blind Treatment

ऐकून हाक माझी, जाते खोलीत आतल्या ती
Deaf Treatment Deaf Treatment

करपून जरी गेला भात, जेवताना तोच ताटात
Hot Treatment Hot Treatment

शिळी आमटी फ्रिजमधून, तशीच आली वाटीतून
Cold Treatment Cold Treatment

सांगू कुणा, शोधू कुठे, असेल ना यावर
Some Treatment? Some Treatment?

पण ज्याला विचारतो तो म्हणतो बापडा
No Treatment! No Treatment!

सुरेश नायर

३/२०/१६

Wednesday, December 28, 2011

संकल्प (New Year Resolution)

आजकाल मी New Year Resolution करत नाही 
कारण ते पाळणं, सालं आपल्याला जमत नाही

Diet करा, Healthy खा, मीठ कमी, तेलकट टाळा? 
अहो सलाड व कच्च्या भाज्या पोटाला पचत नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही

Soda आणि Coke मी शक्यतो टाळतो 
Whiskly आणि Rum नेहमी नीटच घेतो 
उन्हाळ्याशिवाय एरवी कधी Beer मी घेत नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही 

भानगडी, प्रेम प्रकरणं वगैरे दुसऱ्यांना शोभतं 
सिनेमातल्या हिरॉइन वर आमचं आपलं भागतं 
बायको सोडून कुणाकडे डूंकूनदेखील मी पहात नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही 

थोडं नाच, थोडं गाणं, थोडं Karaoke Partying 
कधी Family Dinner, कधी Guys Night Outing 
याशिवाय आणखी मी स्वतःला Entertain करत नाही 
आजकाल मी New Year Resolution करत नाही 

वर्ष काय, दिवस काय, सगळं मानण्यावर असतं 
रोजचा दिवस नवीन असतो, रोज काही घडत असतं, 
Journey चा मी आनंद घेतो, Destination चा विचार करत नाही 
आजकाल मी New Year resolution करत नाही 

सुरेश नायर 
(डिसेंबर २०११)

Tuesday, February 15, 2011

नको पाऊस पाऊस

नको  पाऊस  पाऊस, जीव  होतो  कसाबसा
मारशील  कारे  दडी, तुला  देतो  खरा  पैसा

नको  पाऊस  पाऊस, सगळीकडे  नुसता  राडा
कुठे  तुंबली  गटारे, कुठे  खचे  जुना  वाडा

नको  पाऊस  पाऊस, बसे  खिशाला  कात्री
ह्याला नवा रेनकोट, तिला  नवी  कोरी  छत्री

नको  पाऊस  पाऊस, कपडे  ओले  दोरीवर
उद्या  घालावी  लागेल, तशी  ओली  अंडरवेअर  

नको  पाऊस  पाऊस, रस्त्या खड्डे  जणू  'crater '
त्यावर  टेलिफोनवाले, भरती  खणायचे  'tender

नको  पाऊस  पाऊस, होतो  ऑफिसला  उशीर
दारी  उभा  साहेब, त्याला  गाडी  अन  ड्रायवर  

नको  पाउस  पाउस, सर्दी  खोकल्याची  साथ
दमा  उफाळे  कुणाचा, कुणा  त्रासे  संधिवात

नको  पाऊस  पाऊस, जप  करी  शहरवासी
जारे  गावाकडे  तुझी, वाट  पाहे  शेतकरी  

सुरेश नायर

२ /२०१०

New England Trip - Summer 2023

Links to all photos and videos from the trip  https://photos.app.goo.gl/XqbL45Cf6DTUyyLq5 Planning I asked my son Malhar where he wanted to ...