Friday, September 16, 2016

एक श्रावण असाही

एक श्रावण असाही मनाच्या कोपऱ्यात
घालतो झिम्मा कधीही हवे तेव्हा वर्षात

कोण जाणे केव्हा तो येईल सामोरात
मखमली हिरवाळीत कि इंद्रधनु रंगात

मेघ दाट आषाढी अन वैशाखी वणव्यात
लपालपी, शिवणापाणी  खेळतो दंगात

भिजलेल्या उन्हात किंवा सोनेरी पावसात
आठवांच्या सरी बरसती रिमझिम नयनात

ओळखीच्या गाण्यांचे शब्द फुटे ओठात
जुने सूर फिरुनी पुन्हा फेर धरी कानात

मागे कधी, कधी पुढे, कधी भुई गगनात
झोके घेत, हिंदोळत, छळें मला दिनरात

एक श्रावण असाही हृदयाच्या कोंदणात
सखासोबती उरून राही माझा एकांतात

सुरेश नायर
9/2016



I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...