प्रत्येक माणसाचा एक मूळ जात्या स्वभाव असतो. पिंड म्हणा हवे तर. काही नैसर्गिक वृत्ती (introvert, extrovert, personality types वगैरे) तर काही आयुष्यातले वेगवेगळ्या वयातले अनुभव या सगळ्याचे सार त्यात सामावले असते.
स्वतःचा विचार करता वाटते मी कसा आहे? मी introvert and extrovert च्या मध्ये कुठेतरी पडतो. काही लोकांना एकटेपण अजिबात पेलवत नाही, तर काही माणूसघाणे असतात. मी एकटेपणात स्वतःला रमवू शकतो. वाचन, लेखन, संगीत, प्रवास, टिव्ही-सिनेमा असे छंद मला एकटेपणात छान साथ देतात. पण चारचौघात देखील मी मनमोकळे मिसळू शकतो. फक्त फार फाफटपसारा आणि माणसांचा गोतावळा जमवण्यात मला इच्छा नाही. ठराविक लोकांशी, ज्यांच्याशी चांगले सूत जमते, त्यांच्या बरोबर वेळ घालवणे मला अधिक आवडते.
काही बाबतीत मी आडमुठा, तत्वाला जागणारा /principled वगैरे आहे (असे इतरांचे म्हणणे आहे😊). वारा वाहेल त्या दिशेला वाकायचे, मुत्सद्दी, तोलून मापून वागायचे असे मला नेहमीच जमत नाही. एखादी गोष्ट पटली नाही तर मी माझे म्हणणे, माझी position स्पष्ट बोलून दाखवतो. यात कुणाशी वैयक्तिक (personal) असे काही नसते. फक्त त्या मुद्द्यावर मला जे वाटते ते मी मांडत असतो. एकदा कुणीतरी मला म्हणाले "You are pointing out some systemic issues. Nothing wrong with that". पण तरीही कधीकधी गैरसमज होतात. पण सुदैवाने आजवर कुणाशी त्यामुळे एकदम गट्टीफू झालेली नाही. एका मित्राने माझ्या वागण्याचे विश्लेषण असे केले
१. तू काहीसा कलात्मक वृत्तीचा आहेस आणि असे लोक थोडे off म्हणजे सनकी 😇असतात
२. तुझे वय वाढत चालले आहे
३. तू पुण्याचा आहेस!
मला एकदम 💯% पटले. वयाचे म्हणाल तर ही दुधारी तलवार आहे. एकीकडे थोडा संयम राखणे, जिथे आपल्याला पटत नाही त्यापासून गप्प, दूर राहणे वगैरे maturity आली आहे. पण दुसरीकडे सवईमुळे किंवा अंगवळणी पडल्यामुळे काही गोष्टींचा tolerance देखील कमी झालाय. But whatever, it is its too late for the ship to turn around completely. जिथे तिथे मनात एक, बाहेर एक असे compromise तरी किती करायचे? असा मी, असा मीच राहणार.
मला ' मेरी तस्वीर मे रंग और किसिका तो नहीं' या गझल मधील एक शेर आवडतो
जिंदगी तुझसे हर इक सांस पे समझौता करू
शौक जीने का हैं मुझको, मगर इतना तो नहीं
सुरेश नायर
९ सप्टेंबर '२५