तू अशी स्वप्नात माझ्या सारखी येऊ नको
येउनी रात्रीस माझी झोप तू नेऊ नको
चांदणे होऊन माझे अंग तू जाळीस का
दूर राहुनी उभी माझी चिता पाहू नको
होऊनी विषकन्यका ओठास या चुंबीस का
प्राशुनी ते विष मी झुरता अशी हासू नको
मांडला हा डाव तू माझेच होई खेळणे
टाकुनी फासे अशी हा खेळ तू खेळू नको
सुरेश नायर
No comments:
Post a Comment