Saturday, January 14, 2017

कशाला उद्याची बात

कशाला उद्याची बात, म्हणतो पतंग आकाशात
मुक्त मोकळे उडेन, जोवर पडे न गोते खात 

कशाला उद्याची बात, म्हणते समईमधली वात
आजच म्हणते घेईन, पूर्ती न्हाऊन प्रकाशात

कशाला उद्याची बात, गाती फुले एकसुरात
फळे होऊ कि निर्माल्य, कशास निष्फळ वाद

कशाला उद्याची बात, नाही अर्थ उगा पुसण्यात
निसटून जाती बघ फुकाचे, क्षण मोलाचे त्यात

No comments:

Post a Comment

पुन्हा एकदा

  कधी वाटते पुन्हा एकदा, मागे जाऊन प्रेम करावे आंधळ्याने अनुभवले जे, डोळसपणे पुन्हा करावे विशीतल्या त्या प्रेमामध्ये, धुंदी, कैफ, नशा होती स...