शेवटी कविताच ती, सुचली तर सुचली
नाहीतर रुसून, कोपऱ्यात बसली
कितीही मनावले, अन केली विनवणी
हटून बसते बापडी, देत हुलकावणी
मग सहज नकळत, कधी येते सामोरी
आपण मात्र धरावी, तोवर थोडी सबुरी
कारण असतेच ती, फुलपाखरासारखी
स्वैर भटकणारी, जणू एक शब्दपरी
येते तेव्हा देऊन जाते, सुंदरसे नजराणे
गजल, रुबाई, अभंग, ओवी, कधी केवळ गाणे
सुरेश नायर
२ जुलै , २०१७