Sunday, December 25, 2022

सांताची भेट


X'mas to all. Forget the gifts🎁, enjoy the spirit.🎄🔔🎊

शेकोटीच्या जागेपाशी, बांधून ठेवले मोजे
दूध ठेवले पेल्यामध्ये, कुकीज केले ताजे

रात्री कधी झोपले असता, घेऊन मोठे ओझे
हळूच येऊन गेला सांता, घेऊन गेला मोजे

ठेऊन गेला चिट्ठी एक, होते जिथे मोजे
लिहिले होते चिट्ठीमध्ये, "ऐका, अहो राजे

कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे
फुकट भेटी वाटत फिरणे, वय नाही माझे

कष्ट करून घाम गाळ, होईल बरे तुझे
पुढल्या वर्षी ठेवणार नाहीस, म्हणून नेतो मोजे"

सांताने काही दिले नाही, म्हणू तरी कसे?
देऊन गेला धडा खरा, आभार आहेत त्याचे

सांताविना नाताळात फार, वाटेल उदासवाणे
भेट, बक्षीस काही नको, पण भेटीस नक्की येणे

Tuesday, December 13, 2022

नौका


शंखमुखम येथील किनाऱ्यावर घेतलेल्या फोटोवरून सुचलेली कविता...


नववधूपरी नटूनी थटूनी, तीरावरल्या वाळूवरती

वाट पाहते मी एकांती, कधी सागरा येईल भरती


स्थिर जरी हा असे किनारा, वाळू देई ऊब निवारा

तरी न वाटे मनी दिलासा, खिळून दृष्टी असे सागरा


तीरावर जरी माहेर माझे, पाण्यावर संसार विराजे

लेणे ल्याले सौभाग्याचे, नितळ, अथांग सागराचे


वादळ, वारा, विशाल लाटा, वाहीन त्यातून काढीत वाटा

भय, काळजीस देऊन फाटा, सागर असता पाठीराखा


जन्मच सारा असाच जावा, हसत गात नित हिंदोळावा

एके दिनी मग विलीन व्हावा, सागरहृदयी खोल तळाला


Like a newlywed bride, I await on the sandshore

All alone by myself, for the high tide to return


The shore offers stability, the sand, warmth & comfort

The mind still feels restless, eyes remain focused on the ocean


The shore is my parental home, the water is my marital abode

I remain committed forever, to the clear, vast ocean


Through storms & churning waves, I will wade finding my way

Without fear or any worries, The ocean, my guarding companion


Let the life be spent this way, Smiling, Singing, Swaying

Until one day I will lay to rest, Deep under, in the heart of the ocean


Suresh Nair

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...