Sunday, December 25, 2022

सांताची भेट


X'mas to all. Forget the gifts🎁, enjoy the spirit.🎄🔔🎊

शेकोटीच्या जागेपाशी, बांधून ठेवले मोजे
दूध ठेवले पेल्यामध्ये, कुकीज केले ताजे

रात्री कधी झोपले असता, घेऊन मोठे ओझे
हळूच येऊन गेला सांता, घेऊन गेला मोजे

ठेऊन गेला चिट्ठी एक, होते जिथे मोजे
लिहिले होते चिट्ठीमध्ये, "ऐका, अहो राजे

कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे
फुकट भेटी वाटत फिरणे, वय नाही माझे

कष्ट करून घाम गाळ, होईल बरे तुझे
पुढल्या वर्षी ठेवणार नाहीस, म्हणून नेतो मोजे"

सांताने काही दिले नाही, म्हणू तरी कसे?
देऊन गेला धडा खरा, आभार आहेत त्याचे

सांताविना नाताळात फार, वाटेल उदासवाणे
भेट, बक्षीस काही नको, पण भेटीस नक्की येणे

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...