Sunday, February 23, 2025

एक फांदी चार पक्षी

एक फांदीवर चार पक्षी एवढ्या visual वर सुचलेली एक कविता. कधी कधी कविता आपसूक स्वतःचे एक वळण घेते, आपला तसा हेतू नसला तरी..

एक फांदी चार पक्षी
एक काळा एक पांढरा 
एक करडा एक वेगळा

काळ्या पांढऱ्याचे जुळेना सुत 
अन करडा वाहे मधोमध
पण वेगळा वेगळाच राही
त्यासी कोणी विचारत नाही

वेगळ्याचे रंग आहेत कितीक
तरी नाही कुणा त्याचे कौतुक
वेगळ्याशी कुणी ना करे हो सलगी 
वेगळ्याचा जगी नाही कुणी वाली

किती रंग पिसांचा जरी निराळा 
जरी बोल प्रत्येका गळा वेगळा
तरी पाही जो त्या पडे हेच दृष्टी
एका फांदीवर आहेत चार पक्षी

सुरेश नायर
2/१९/२०२५

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...