हे जीवन म्हणजे नाट्यचक्र,
वाट न जाते सरळ कधी ही,
असते सदैव वक्र....
हे जीवन म्हणजे नाट्यचक्र…
सत्कर्माने दुष्कर्माने, घडतो आपण निजकर्माने
पापाचे अन पुण्याईचे, अविरत फिरते चक्र
हे जीवन म्हणजे नाट्यचक्र, हे जीवन म्हणजे नाट्यचक्र
मायावी जग मोह्जाळाचे, सत्य न काही, मृगजळ सारे
कधी, कसे अन काय घडावे, नियतीचे हे चक्र
हे जीवन म्हणजे नाट्यचक्र, हे जीवन म्हणजे नाट्यचक्र
२०१३ साली मी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले नाटक 'नाट्यचक्र' आम्ही डेट्रोइटला सादर केले. त्यासाठी हे गाणे लिहून मी ते चालीवर बांधले व मृणालिनी अर्काटकर यांच्या आवाजात रेकॉर्ड केले.
No comments:
Post a Comment