श्रीरंगाने मारला खडा
घट शिरीचा फुटला
नखशिखांत भिजले, पुरी मी
तोलही माझा सुटला
यमुनातीरीच्या वाळूवरती
पडले कशी कळेना
जाऊ कशी आता घरी मी
असह्य या वेदना
गर्द रान हे दाट सभोती
संध्येच्या वेळेला
अडले कशी मी या एकांती
सखीही ना संगतीला
श्रीरंगाला मग पाहवेना
दीनवाणी मम स्थिती
उचलून घेता बाहुत त्याच्या
बहरून आली प्रीती
या प्रीतीचे रूप चिरंतन
युगायुगांची बाधा
लक्ष गौळणी गोकुळी जरी का
एकच वेडी राधा
सुरेश नायर
(१९८९)
No comments:
Post a Comment