Friday, November 12, 2021

मी श्याम वेडी

खूप दिवसांपासून पहिल्या दोन ओळीत अडकलेलं हे गीत आज आपसूक पूर्ण झालं. 

राधेचा ऐतिहासिक किंवा महाभारत वगैरे ग्रंथात असा संदर्भ नाही. ती मुख्यतः कविकल्पनेतच आढळते, कृष्णाची प्रेयसी, प्रेमाचं प्रतीक म्हणून. त्याच भावनेतून लिहिलेलं...

मी श्याम श्याम श्याम श्याम श्याम वेडी
ज्याचे नाव नाव नाव नाव माझे ओठी
बांधल्या जयाशी जन्मोजन्मीच्या गाठी
झुरते सदा मी ज्याच्या भेटीसाठी 

जो व्यापतो या पृथ्वी अन नभात
जो व्यापतो साऱ्या जनामनात
रुक्मिणि, सुभद्रा, मीरेचा तो नाथ
पण प्रेमसखा तो केवळ माझ्यासाठी

ना इतिहासी मी नाही पुराणात
की कल्पनाच जी स्फुरली कविमनात
हे सत्य तरी या साऱ्या असत्यात
राधा प्रेयसी एकच ती कृष्णाची

No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...