Wednesday, March 16, 2022

कधी कधी होते असे

एकदा सहज मी तलतचं "जलते हैं जीसके लिए" जरा वेगळ्या उडत्या चालीत गुणगुणायला लागलो. मग काही दिवसांनी विचार आला की आपली चाल आहे तर त्यावर आपलेच शब्द घालावे आणि त्यातून हे गीत घडून आले.

कधी कधी होते की असे, लागते कशाचे पिसे 
ध्यानी मनी मग एकच ते, दुजे काही न सुचे

 कधी वाटे उंच आकाशी झेप घेत पंख पसरावे 
कधी वाटे हलके हलके पाण्यावरी मी तरंगावे 
कधी वाटे शाल पांघरुनी शेकोटीशी हात उबवावे 
अन गुणगुणत अंगाई, कुणी शांत मज निजवावे 

कधी यावा सूर्य हाताशी कधी सजावा चंद्र शिरी 
कधी वेचू तारे यावे भरभरूनी माझ्या ओंजळी 
कधी अणुमात्र होऊन मी हरवावे न पहावे कुणी 
कधी पहावे तिथे मी असो विश्वची घ्यावे व्यापुनी 

कधी हसावे स्वतःवर मी कधी रडावे कुणासाठी 
कधी थोपटावी पाठ कुणी हात धरावा कुणी पाठी 
कधी कुणा देत आधार, व्हावे कुणाची कधी काठी 
कधी जगावे स्वतःसाठी, कधी मरावे कुणासाठी



Wednesday, March 9, 2022

रात्रभर काल

रात्रभर काल, दुरून कुणी, साद देत होते
फिरफिरुनी, जवळी कुणी, भास होत होते
चंद्र होता की तो खट्याळ वारा
शीळ हलकी घालत वाहणारा
तो-पहा उघडी कवाड, उडवी पडदे
का उगा मांडलाहे छळ हा कोणी
ये जरा थांब येऊन मज समोरी
जे-का व्हायचे ते, आपुल्यात घडूदे
की असे खेळच हा माझ्या मनीचा
घालविण्या वेळ तो एकलेपणीचा
छंद हा रोजचा मजला जडूडे

असा मी असा मी

प्रत्येक माणसाचा एक मूळ जात्या स्वभाव असतो. पिंड म्हणा हवे तर. काही नैसर्गिक वृत्ती (introvert, extrovert, personality types वगैरे) तर काही ...