ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा
असा पाउस पडावा, सुक्या मातीस ओलावा
धरीत्रीत निजलेल्या, बिजा अंकुर फुटावा
असा पाउस पडावा, पिके जोमाने वाढावी
दोन्ही वेळा चुलीवर, पुन्हा भाकर शिजावी
असा पाउस पडावा, त्याचा पैसा झाला खोटा
नंदीबैल यावा दारी, सांगे 'सुट्टी आज शाळा'
असा पाउस पडावा, मोरपिसारा फुलावा
घरी दारी अंगणात, राग मल्हार घुमावा
असा पाउस पडावा, झिम्मा खेळतील सरी
बळीराजा ही खेळेल, हिरव्या रंगाची पंचमी
असा पाउस पडावा, झरे तुडुंब वाहती
घेती दरीतून उड्या, त्यांची धिटाई केवढी
असा पाउस पडावा, पुर यमुनेस यावा
कुणी गोपिका बावरी, सखा कृष्ण कुणी व्हावा
असा पाउस पडावा, सारे चिंब चिंब व्हावे
मेघ धरेस भेटता, त्यात मीही विरघळावे
सुरेश नायर
१/२०१०
No comments:
Post a Comment