आयुष्याच्या पूर्वार्धात खूप काही गोष्टी आपण ठरवतो, स्वप्न रंगवतो, इच्छा - आकांक्षा यांचे मनोरे रचतो. बरंच काही पूर्तीस येतं पण खूप काही राहूनही जातं. मग उत्तरार्धात राहून राहून मागच्या कुठल्यातरी ठरलेल्या गोष्टीवर (constant) आपण फिरून फिरून येतो. जे हवं होतं ते तर निसटून गेलं असतं म्हणून मग 'फुलांनी ओंजळ भरलीये ना' असं म्हणत, आपली आपणच समजूत काढतो. अर्थात सरळ सोट शब्दात हे मांडणं आणि कवितेतून मांडणं यात खूप फरक आहे. इथे कवयित्रीची काव्यप्रतिभा सामोरी येते. 'केसात राखडी पण पायात फुगडी' अश्या मोजक्या शब्दात त्या खूप काही सांगून जातात.
सुनीताबाई (देशपांडे) यांच्या आवाजात ही कविता ऐकल्यानंतर मनात रुतून बसल्या शिवाय राहत नाही. अनेकदा आठवली कि पुन्हा वाचन होतं. एकदा सहज एक चालीत वाचत गेलो आणि तीच खाली देत आहे.
चाफ्याच्या झाडा….
चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
का बरे आलास आज स्वप्नात?
चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय…. कळतंय ना….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना
– पद्मा गोळे
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा
Ya kavitet.. chafyacha zad hey balpanichya mitracha pratik tar nahi na?
ReplyDelete