Wednesday, April 6, 2016

तू असताना

ही कविता गीतरुपात ऐकण्यास इथे क्लिक करा 


तू असताना मी बावरते
तू नसताना मी हुरहुरते
हा रोग असा मज जडला का
असुनी ही न मी, माझी उरते

आरशात पाहता मजला मी
माझी न मला प्रतिमा दिसते
तू हसताना असतोस तिथे
अस्तित्व न काही मज उरते 

जागेपणी तू, स्वप्नातही तू,
डोळ्यातही तू, हृदयातही तू,
हासुतही तू, अश्रूतही तू
व्यापून तुझ्यात मी अवतरते 

सुरेश नायर
४/२०१६


No comments:

Post a Comment

तू जिथे मी तिथे

A new duet song composition by me. All the photos are taken by me on recent trips. तू जिथे मी तिथे, मी जिथे तू तिथे राहूया येथ ना, राहुदे जग...