Sunday, December 15, 2019

ध्यानस्थ झाले श्रीगजानन

मधुरा मराठेने पोस्ट केलेल्या चित्रावर मी आधी दोन ओळी लिहिल्या होत्या. आता दोन ओळींची एक छोटी कविता झाली आहे आणि "बाप्पा परत कुठे जातात आणि काय करतात?" याचं एक (काल्पनिक) उत्तर सापडलं. 
वृक्षोदरी रुद्राक्ष लेऊन
ध्यानस्थ झाले श्रीगजानन

दहा दिवसांचा आंनद सोहळा
भक्तजनांचा जल्लोषित मेळा
देता निरोप हृदयस्थ होऊन
गहिवरून आले श्रीगजानन

भाद्रपदी पुढल्या भेटण्या सर्वा
मने सुखवाया येईल सुखकर्ता
तोवर या भेटीचे करावया चिंतन
ध्यानस्थ झाले श्रीगजानन

PC: Madhura Marathe


No comments:

Post a Comment

ये पावसा

ये पावसा मेघांचा रथ करुनी भेटून जा तू आनंदे बरसोनी  संकेत देई माती मृदगंध शिंपडूनी  वाराही गाई गाणी येणार तू म्हणोनी सृष्टीच आहे सारी तुजसाठ...