Tuesday, December 3, 2019

असेल कारे देवा


असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?
नरकात तर ना जाणार नाही थोड्या चुकीमुळे?

गणिताच्या पेपरमध्ये केली होती नक्कल
बरे-वाईट कळण्याची नव्हती तेव्हा अक्कल

शिक्षकांचा बेदम मार, शिक्षा नाही का पुरे?
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

पहिल्या नोकरीच्या अर्जात, झाली थोडी गफलत
साठातला सहा उलटा होऊन, झाले टक्के नव्वद
त्यावर झाली निवड, पण टिकलो राबल्यामुळे
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

पाहायाला गेलो होतो, सुगरण छानशी बायको
श्रीमंती सासरेबुवांची, त्यावर जास्त भाळलो
आनंदे नांदवला संसार, वाढवली चार मुले
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

झाले आता वय उतार, दुखणी दहा हजार
तरी कधी मित्रांसोबत, घेतो पेग दोन-चार
मेरे जैसे दोस्त भी अपने, राज कैसे खुले ?
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?

नाही भांडण तंटा, नाही वृत्ती राजकारणी
घोषणा एका पक्षाच्या, पण मत विरोधकासी
नाकासमोर चाललो सरळ, ना कुणा दुखवले
असेल कारे देवा मला स्वर्गाचे दार खुले?


No comments:

Post a Comment

I am Me

Everybody at some point or other, in some setting or other feel like a misfit. Some adjustments are necessary in any social or other setting...