सर्वपरिचित येसुदास यांचा मुलगा विजय येसुदास याचे एक मल्याळम गीत . मला खूप आवडले. त्यातले बरेच शब्द (अनादी, युग, पुरातन, दूर, नितांत, एकांत, हृदय, अग्नी, दाह, कोटी, किरण, भूमी, स्नेह, अति, गूढ, विकार, अविराम, प्रणय) मराठीत परिचित वाटले म्हणून ह्या चालीवरच त्यातले काही शब्द उसने घेत हे गीत बांधले.
अनादी युगाहूनी तुला मी पाहतो
अनंत क्षणातुनी तुला मी जाणितो
तरीही पुन्ह्याने कितीदा
तू भेटते, मजला नवी
अनंत क्षणातुनी तुला मी जाणितो
तरीही पुन्ह्याने कितीदा
तू भेटते, मजला नवी
कोणी नसतानाच भवती
भासते तू नितांत जवळी
पण सभोती सर्व असता
तुजविना मी एकांती
अति गूढता तुझ्यातील ही
दे सारुनी, ये समोरी
कोटी किरणें तुझ्या भोवती
रत्नहारासम झळकती
मी कसे पाहू तुला गे
नेत्र दिपल्यावाचूनी
पापण्या मिटुनी घेता
तुज पाहुदे हृदयातुनी
No comments:
Post a Comment