(हे गीत जगजीत सिंग यांच्या "तुमको देखा तो ये खयाल आया" या गीताच्या चालीवर रचले आहे. ऐकण्यास इथे क्लिक करा)
हर्षभावांचा झुलतोय झुला
जीवनी तू भेटलीस मला
कोरडे अर्थशून्य होते सारे
तोच जाणवला तुझा स्पर्श ओला
जीवनी तू भेटलीस मला
शब्द नजरेचे अर्थ भावांचे
लक्ष रचना अशा रचिल्या गेल्या
जीवनी तू भेटलीस मला
गुंफता हात गात्र हे स्फुरले
रात्र सरली सौख्यदिन आला
जीवनी तू भेटलीस मला
सुरेश नायर