'बंद ओठांनी निघाला' ह्या सर्वसाक्षी चित्रपटातील गीताच्या चालावर रचलेले गीत. ऐकण्यास इथे क्लिक करा
गीत ओठातून येता सूर माझा हरवला
गीत ओठातून येता सूर माझा हरवला
घोट एखादाच घेता जाहला पेला रिता
चाललो होतो सुखाने घेत वळणे एकला
टाकुनी मागे दऱ्या अन पर्वतांच्या शृंखला
तोच एका वादळाने मार्ग माझा रोखला
गीत ओठातून येता सूर माझा हरवला
गवसले होते मला ते साठ्वूनी ठेविले
पण एका क्षणात सारे मजपासून दुरावले
कोण मी? हिशेब सारा नियतीने हा मांडला
गीत ओठातून येता सूर माझा हरवला
सुरेश नायर
१९९६