शून्य गाव शून्य वस्ती
शून्य झाडे शून्य घरटी
शून्य खिडक्या शून्य दारे
शून्य भिंती शून्य वारे
शून्य दिवा शून्य वाती
शून्य पणती शून्य ज्योती
शून्य शब्द शून्य अर्थ
शून्य ओळी शून्य पानी
शून्य डोळा शून्य आसू
शून्य गाली शून्य हासू
शून्य अधिक शून्य वजा
शून्य हाती शून्य बाकी
शून्य जगतो शून्य आम्ही
शून्य सारे शून्य मीही
सुरेश नायर
२ /२०१०
ह्या कवितेचा संदर्भ नक्की द्यायचा कसा हा स्वतः मला प्रश्न आहे. कारण कधी, केव्हा आणि का ह्या अशा शून्याच्या भकास चित्राची झलक मला दिसली ते सांगता येणार नाही. खूपच नकारात्मक भावना आहेत म्हणून मी ही कविता पूर्ण न करता सोडून देणार होतो. पण दुर्दैवाची वस्तुस्थिती अशी आहे की कित्येकांच्या मनात हे असेच चित्र कदाचित रोज दिसत असेल. एकदा कधीतरी माझ्या मनात 'One Flew Over The Cuckoo's Nest' हा चित्रपटही डोकावून गेला.
No comments:
Post a Comment