चंद्राचा मंद प्रकाश की तुझ्या चेहऱ्याची तजेलता
बावरल्या हरणीचे पळणे की तुझ्या डोळ्यातली चंचलता
फुलपाखराचे सहज उडणे की तुझे असे बागडणे
वाऱ्याची जराशी झुळूक की तुझे उगी गुणगुणणे
अंगावरून मोरपीस फिरणे की तुझा हलका स्पर्श
पाण्यावर तरंगणाऱ्या लहरी की तुझ्या मनातला हर्ष
जाईच्या फुलांचे कोमेजणे की तुझे उगी हिरमुसणे
काचेच्या बांगड्यांचे किणकिणणे की तुझे निखळ हसणे
मुग्ध मी मोहित मी की कल्पनेत मन रंगलेले
सत्य तू असत्य तू की स्वप्न जागेपणी पाहिलेले
सुरेश नायर
२००६